केळ्यांची पानगी








केळ्यांची पानगी




















केळ्यांची पानगी
केळ्यांची पानगी उपवासासाठी किंवा नैवेद्य साठी बनविला जातो...
साहित्य
पिकलेली केली २ ते ३
शिंगाडा पीठ १ वाटी
गूळ किसलेलं १/३ वाटी
वेलची पूड १/२ लहान चमचा
तूप २ मोठे चमचे
केळीचे पान

कृती
एका वाडग्यात / भांड्यात पिकलेले केळीचे काप करून घ्या
किसलेलं गूळ , शिंगाडा पीठ व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या
मिश्रण मऊसर असावे पानगी छान होतात
आता केळीचे पान लहान गोलाकार कापून घ्यावे त्यावर हाताच्या बोटांना तूप लावून थापून घ्यावे
थापून झाल्यावर त्यावर त्याच आकाराचे केळीचे पान ठेवावे
पॅन मध्ये झालेले पानगी ठेवून त्यावर झाकण ठेवून वाफवून घ्यावे
दोन्ही बाजूंनी वाफवून घ्यावे
केळ्याचे पानगी अश्याप्रकारे बनवून घ्यावे
वाफवलेले पानगी तुपावर थोडे लालसर रंगाचे होइपर्यंत भाजून घ्यावे व वर गुळाचा खडा व केळ्याचे काप ठेवून सर्व्ह करावे
टीप
पानगी वाफवलेले व तुपावर भाजलेले दोन्हीं प्रकारे बनविले आहेत तुपावरचे पानगी खूप छान लागतात

Comments