घोसाळ्याची भजे



घोसाळ्याची भजे 


Aarti Nijapkar





















बनविण्यासाठी वेळ १५ मिनिटे
वाढणीसाठी ३
साहित्य
घोसाळे १ (साधारण ८ ते १० इंच लांबीचा)
बेसन ३/४ किंवा आवश्यकतेनुसार
पाणी ३/४ कप किंवा आवश्यकतेनुसार
ओवा १/४ लहान चमचा
लाल तिखट १ लहान चमचम
हळद १/२ लहान चमचा
जिरे पूड १/२ लहान चमचा
धने पूड १/२ लहान चमचा
गरम मसाला १/४ लहान चमचा
कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
मीठ चवीनुसार
तळण्यासाठी तेल
कृती
घोसाळे धुवून पुसून घ्यावे मग सोलून त्याच्या एक ते दीड सेमीच्या चकत्या (काप)कराव्यात
एका गोलसर भांड्यात बेसन, ओवा, लाल तिखट, हळद, धने जिरे पूड, गरम मसाला,मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ भिजवावे पीठ घट्ट किंवा पातळ नसावे मध्यमसर भिजवावे बेसनच्या मिश्रणाला १ ते २ मिनिटे चमच्याने चांगले फेटून घ्यावे बेसनचं मिश्रण चांगलं फुगून येईल कढईत तेल गरम करा तेल गरम झाले कि  घोसाळ्याचे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून तेलात टाकावेत गॅस मध्यम ठेवावे मग दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावेत टीप
लाल तिखटाऐवजी हिरव्या मिरच्या वापरु शकता
घोसाळे गोलाकार ऐवजी उभे कापले तरी चालतील

Comments