बाजरीचे लाडू



बाजरीचे लाडू






तयारीसाठी वेळ १० मिनिटे 
बनविण्यासाठी वेळ ३० ते ३५ मिनिटे 
वाढणीसाठी ३ 

बाजरीचे लाडू
साहित्य
बाजरीचे पीठ २ वाटी
साजूक तूप १ वाटी
रवा २ चमचे
डिंक २ चमचे
गुळ १ - १ १/२ वाटी
वेलची पूड
बेदाणे 
कृती
प्रथम कढई गरम करून मध्यम आचेवर रवा खरपूस लालसर भाजून घ्या.
गरम कढईत तुप घालून डिंक तळून ताटात काढून घ्या
नंतर त्यात अजुन थोडे तुप टाकून बाजरीचे पिठ १५ ते २० मिनीटे मंद आचेवर भाजून घ्या तुप थोडे थोडे घालून पीठ व्यवस्थित भाजून घ्या
पिठाला छान खमंग  येईपर्यंत भाजून घ्या मग  एका ताटात काढा
नंतर गरम कढईतच गुळ  वितळून घ्या.
आता भाजलेले बाजरीचे पिठ त्यात भाजलेला रवा, तळलेला डिंक (हाताने किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या) बेदाणे वेलची पूड आणि गुळ घालून मिश्रण एकजीव करून घ्या मिश्रणाचे मध्यम  लाडू वळून घ्या अश्याप्रकारे सर्व लाडू वळून घ्या
तयार बाजरीच्या पिठाचे पौष्टिक लाडू खायला तयार आहेत
हवाबंद डब्यात ठेवा
टीप
जास्त दिवस किंवा १० ते १५ दिवसापर्यंत बाजरीचे लाडू ठेवायचे असतील तर साखरेचा वापर करावा

Comments