स्वीट कॉर्न पॅनकेक

स्वीट कॉर्न पॅनकेक
Aarti Nijapkar














तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्याची वेळ ३० मिनिटे
 वाढणीसाठी ३

स्वीट कॉर्न पॅनकेक
साहित्य
स्वीट कॉर्न १ वाटी
कांदा १ मध्यम
हिरवी मिरची १
कोथिंबीर १ लहान चमचा
आलं १/२ इंच
लसूण २ पाकळ्या
लाल तिखट १ लहान चमचा
गरम मसाला१/२ लहान चमचा
हळद १/३ लहान चमचा
मीठ चवीनुसार
बेसन १ मोठा चमचा
तांदळाचे पीठ १ चमचा
तेल गरजेनुसार

कृती
स्वीट कॉर्न पॅनकेक बनवण्यासाठी प्रथम एक वाटी स्वीट कोर्न मिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता थोडी मध्यमसर भरड करून घेऊ आता ही केलेली भरड एका खोलगट भांड्यात टाकून त्यात चिरलेला कांदा, हिरवी मिरची , कोथिंबीर बारीक चिरलेली आलं व लसुण, लाल तिखट, गरम मसाला, हळद चवीनुसार मीठ, बेसन तांदळाचे पीठ हे सर्व साहित्य घालून मिश्रण एकजीव करून घेऊ हे मिश्रण एकजीव केल्यानंतर ५ ते ७ मिनिटे त्यावर झाकण ठेवून देऊ
गॅस वर पेन किंवा आपल्या घरी असेल तो तवा तापवून घ्या त्यावर थोडेसे तेल लावून घ्या आता स्वीट मिश्रण घेऊन चमच्या साहाय्याने व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्या
गॅस मध्यम करून मिश्रण तव्यावर घालून गोलाकार पसरवून घ्या बाजूने थोडे तेल सोडून दोन्ही बाजूने खरपूस लालसर भाजून घ्या
सर्व स्वीट कॉर्न पॅनकेक अशा पद्धतीने बनवा
तर तयार आहे झटपट नाश्ता स्वीट कॉर्न पॅनकेक
टीप :- पाण्याचा वापर करू नये











Comments