ओल्या नारळाचे लाडू

ओल्या नारळाचे लाडू....    
   
झटपट  होणारे लाडू...

वाढणी : साधारण १० ते १२ छोटे लाडू


साहित्य:
३             कप खवलेला ओला नारळ
१ १/२      कप साखर
१ १/२      कप दूध
१             (tsp)   लहान चमचा  वेलचीपूड
२             (tbsp) मोठे चमचे बदामाचे काप
१             (tbsp) मोठा चमचा तूप
                केशर आवडीप्रमाणे
                काळे बेदाणे सजावटीसाठी
               
कृती:
१) एका पातेल्यात खवलेला ओला नारळ, साखर  आणि दूध एकत्र करावे. मध्यम आचेवर  ठेवून परतावे .

२) पातेल्याच्या तळाला नारळ (मिश्रण ) चिकटू नये म्हणून ढवळत राहावे. दूध आटेपर्यंत परतत रहा.

३) मिश्रण एकजीव झाल्यावर वेलचीपूड आणि बदामाचे काप व केशर  घालावे. मिश्रण घट्टसर होत आले कि गॅस बंद करावा आणि पातेले गॅसवरून उतरवावे.

४) मिश्रण थोडे कोमटसर होवू द्यावे.  थोडासा तुपाचा हात घेऊन लाडू वळावेत.

५) लाडू वळून झाल्यावर त्यावर काळे बेदाणे लावावे

टीप:
१) हे लाडू नरमसर होतात. जर थोडा घट्टपणा हवा असेल दूधाचं प्रमाण कमी घ्यावे.

Comments