मिनी चटपटी आलू मसाला
चटपटी आणि तिखट
साहित्य
२५० ग्रॅम लहान बटाटे (उकडून घेतलेले) २ मिनी चटपटी आलू मसाला
चटपटी आणि तिखट
साहित्य
२५० ग्रॅम लहान बटाटे (उकडून घेतलेले) २ पळी तेल
१/४ टिस्पून मोहरी
१/४ टिस्पून जिरे
५ ते ६ पाने कडिपत्ता
१/४ टिस्पून हिंग
१ लहान बारीक चिरलेला कांदा
१ मोठी उभी चिरलेली हिरवी मिरची
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेबलस्पून चाट मसाला
१ टिस्पून लिंबाचा रस
१/४ टिस्पून हळद
१ टेबलस्पून लाल तिखट
१/२ टिस्पून धनेपूड
१/२ टिस्पून जिरेपूड
१/२ टिस्पून गरम मसाला
चवीनुसार मीठ
कृती
१) प्रथम लहान बटाटे धुऊन त्यात थोडे मीठ व हळद घालून उकडून घ्या.
२) थंड झाल्यावर सोलून घ्या
३) आता एका खोलगट कढईत तेल तापवा
४) मोहरी, जिरे, कडिपत्ता, हिंग व चिरलेली हिरवी मिरची घालून परतून घ्या.
५) मग त्यात चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घ्या.
६) कांदा परतून झाल्यावर त्यात सर्व मसाले, स्वादानुसार मीठ व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकजीव करुन घ्या.
७) बटाटे घालून एकत्र करुन घ्या.
८) झाकण ठेवून ५ ते ६ मि. वाफवून घ्या.
९) आता चाट मसाला व लिंबाचा रस व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकजीव करुन घ्या. व गॕस बंद करा
टिप - बटाटे खूप शिजवून घेऊ नका
Comments
Post a Comment