भोपळ्याचे पॅनकेक






भोपळ्याचे पॅनकेक
















भोपळ्याचे पॅनकेक

न्याहरी साठी उत्तम अशी पाककृती आहे मुलांना शिवाय मोठ्यांसाठी  भोपळ्याचे पॅनकेक अतिशय पौष्टिक आणि चवीला अप्रतिम लागणारी पाककृती आहे
तयारीसाठी ५ मिनिटे
बनविण्यासाठी १० मिनिटे
वाढणीसाठी ३

 साहित्य
लाल भोपळा किसलेले १/३ वाटी
गव्हाचं पीठ १/२ वाटी
तूप १ लहान चमचा
रवा १ मोठा चमचा
गूळ २ मोठे चमचे
मीठ किंचित
दूध १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
तूप किंवा तेल भाजण्यासाठी

कृती
प्रथम लाल भोपळा किसून घ्या
मग गरम पाण्यातून काढा पण उकळवू नये ब्लांच करून घ्या पाणी पूर्णपणे काढा
मग एका भांड्यात गव्हाचं पीठ , किसलेला भोपळा , रवा , मीठ , गूळ , दूध ,तूप घालून मिश्रण फेटून घ्या गुठळ्या राहू देऊ नये जास्त पातळ किंवा जाड करू नये १० मिनिटे झाकून ठेवा
तवा तापवून घ्या मग लहान चमच्याने तव्यावर मिश्रण घाला मधोमध लहान आकाराचे करून घ्या तेल किंवा तूप घाला व मंद आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले भाजा
अश्या प्रकारे सर्व करून घ्या गरमागरम भोपळ्याचे पॅनकेक तयार आहेत

टिप - दूध न वापरता  पाणीही वापरू शकता
पॅनकेक मध्यम आचेवरच भाजावे त्यामुळे आतला भाग ही व्यवस्थित भाजला जाईल

Comments

Post a Comment