भरलेला गाजर हलवा रोल

भरलेला गाजर हलवा रोल


तयारीसाठी वेळ २० मिनीटे
बनविण्यासाठी वेळ ३० मिनिटे
गाजर हलवा म्हणजे आपल्या सर्वांचा आवडता गोड पदार्थ. आपण फक्त कारण शोधत असतो गाजर हलव्याचा बेत करण्यासाठी. पण मी थोडसं वेगळ करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला नक्की आवडेल. खजूराच्या पाकात गाजर हलवा शिजवून ब्रेडच्या स्लाइस मध्ये भरुन तेलात तळणार आहोत. चला तर साहित्य व कृती कडे
साहित्य -
किसलेला गाजर ४ ते ५ मोठे
तूप ५० ग्रॅम
बारीक कापलेले बदाम,पिस्ते,काजू १ मोठा चमचा
वेलची पूड १ लहान चमचा
ओले खजूर बी नसलेले १०० ग्रॅम
पाणी २ कप किंवा आवश्यकतेनुसार
मध २५ मिली
केसर दूध मसाला १ मोठा चमचा
दूध १/२ कप
ब्रेडचे स्लाइस ८ ते १०
ब्रेड क्रम्स १ कप
तेल तळण्यासाठी
कृती
प्रथम एका कढईत खजूर व पाणी एकत्र करुन उकळत ठेवा मंद आचेवर
एका कढईत गाजरचा किस घालून चांगल परतवून घ्या. गाजराचे पाणी सूकत आले की तूप , मावा व बारीक केलेले बदाम , पिस्ते, काजू घाला व तूपात छानसं परतवून घ्या
आता खजूर चांगल शिजल्यावर आच बंद करा मग थंड करुन खजूराची पेस्ट बनवून घ्या
ही पेस्ट आणि खजूराचे पाणी एकत्र करुन घ्या मग गाजराच्या कढईत घाला मिश्रण एकत्र करुन गाजर शिजवून घ्या ८ ते १० मि. मंद आचेवर वाफवून घ्या.
गाजर शिजल्यावर त्यात केसर दूध मसाला , वेलची पूड व मध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
एका ताटात काढून गाजर हलवा थंड करुन घ्या
आता ब्रेड स्लाइस घेऊन त्यावर हलक्या हाताने लाटने फिरवून घ्या
आता लाटलेले ब्रेड स्लाइस कोमट दूधात घोळवून घ्या
मग त्यात गाजर हलवा भरुन त्या ब्रेड स्लाइस बंद करुन गोल वळून घ्या
ब्रेड क्रम्स मध्ये घोळवून घट्ट वळून घ्या ह्या पद्धतीने सर्व गाजर हलव्याचे गोलाकार रोल बनवून घ्या.
कढईत तेल कडकडीत तापवून घ्या
मंद आचेवर सर्व गाजर हलवा रोल तेलात तळून घ्यावे.
किचन टॉवेल किंवा टिशू पेपर वर काढून एका ताटात ठेवून त्यावर मधाची धार सोडा व गरमागरम गरम भरलेला गाजर हलवा रोलचा आस्वाद घ्या
टिप
गाजर हलवा गूळाच्या पाकात केला तरी उत्तम. ब्रेड स्लाइस दूधात जास्त वेळ भिजवू
ब्रेड क्रम्स ऐवजी बटर मिक्सर मधून फिरवून घ्या

Comments

Post a Comment