आंबा मालपुआ / आंब्याचे मालपुआ



आंबा मालपुआ / आंब्याचे मालपुआ 

















आंबा मालपुआ / आंब्याचे मालपुआ 
साहित्य 
१ कप        गव्हाच पीठ   
१ चमचा      मैदा
१/२ चमचा   भाजलेले बडीशेप
चिमूटभर      मीठ 
१ १/२ कप   पाणी 
3 चमचा       आंबा क्रश किंवा आंबा पल्प
१/४ कप       बारीक आंब्याचे तुकडे (पातळ किंवा किसलेली )
तेल               तळण्यासाठी (आवश्यकतेनुसार)
२ चमचा         बदाम व पिस्त्याचे तुकडे (भाजून घेतलेले )
मालपुआ साठी लागणारा साखरेचा १ तारी पाक (छासणी)  
१ कप साखर
२ कप पाणी 
एका भांड्यात साखर व पाणी एकत्र करुन साखर विरघळे पर्यंत गरम करुन घ्या .  पाक जास्त घट्ट करु नये

कृती
एका खोलगट भांड्यात गव्हाच पीठ, मैदा , भाजलेले बडिशेप , चिमुटभर मीठ घालून एकत्र करुन घ्या .
मग पाणी घालून व्यवस्थित एकजीव करुन घ्या (गुठळे न ठेवता) हे मिश्रण इडली च्या (consistency) पीठासारखं झालं पाहिजे.
आता हे मिश्रण १० ते १५ मि. बाजूला ठेवून द्या .
आता ह्या मिश्रणात आंब्याचे बारीक तुकडे (पातळ किंवा किसलेली ) व आंब्याचा पल्प घालून मिश्रण एकजीव करुन घ्या.
आता खोलगट कढई किंवा खोलगट तवा घ्या.
तेल घालून चांगल तापवून घ्या.
मिश्रण लहान खोलगट चमच्याचा सहाय्याने गोल आकाराचे मालपुआ घालावे.
मध्यम आचेवर दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यावे.
मग तळलेले मालपुआ कोमट पाकात घोळवून घ्या.


एका ताटात काढून त्यावर बदाम व पिस्त्याचे तुकडे घालून सजवा.
गरम गरम सर्व्ह करा
टिप
आंब्याचे तुकडे जाड व मोठे ठेवू नये 
आंबा किसून घेतला तरी चालेल 
आंबा मालपुआ रबडी सोबत सुद्धा सर्व्ह करु शकतो

Comments