साहित्य
दही १/२ कप
चिरलेला कांदा १ मध्यम
हिरव्या मिरच्या ४ ते ५
आलं १ टिस्पून
कोथिंबीर २ टेबलस्पून
जिरे जाडसर कुटलेले १ टिस्पून
कडिपत्ते पानं ८ ते १०
मीठ चवीनुसार
मैदा १ कप
तांदळाचे पीठ २ टेबलस्पून
बेकिंग सोडा १/२ टिस्पून
तेल तळण्यासाठी
कृती
एक खोलगट भांड घ्या .
त्यात घट्ट दही बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या , आलं ,कोथिंबीर , कडिपत्ते , जिरे व मीठ घालून मिश्रण एकत्र करुन घ्या. हे मिश्रण ८ ते १० मिनिटांसाठी ठेवून बाजूला द्या.
आता मैदा , तांदळाचे पीठ , बेकिंग सोडा घालून मिश्रण एकजीव करुन घ्या. है मिश्रण इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहिजे.(मऊसर) पुन्हा हे मिश्रण १० मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्या.(मिश्रण मुरण्यासाठी)
आता एका खोलगट कढईत तेल घालून गरम करुन घ्या.
गॕस मंद आचेवर ठेवा .मग गोळे तयार करुन तेलात सोडा साधारण ३ ते ४ मिनिटे थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्या.
तयार भजी हिरव्या चटणी किंवा टोमॅटो साॕस सोबत सर्व्ह करा...
टिप-
दह्याचा चक्का वापरावे. किंवा दह्यात पाणी असेल तर ते काढून टाकावे
(पाण्यामुळे मिश्रण पातळ होऊ शकते)
हे भजी हाताच्या बोटांनी सोडावे , चमचा वापरु नये.
हे भजी लगेच कुरकुरीत गरमागरम खावे.
थंड झाल्यावर नरम (मऊ) होतात.
Comments
Post a Comment