खांतोळी


खांतोळी (पारंपारिक )

साहित्य 
तांदूळ बारीक रवा         १ वाटी 
किसलेला गूळ              १ १/२  वाटी
किसलेला ओला नारळ   १ वाटी 
भाजलेले शेंगदाणे           १/४ वाटी
तूप                               १/४ वाटी
चना डाळ                     १ टेबलस्पून 
मूग डाळ                       २ टेबलस्पून
मीठ                              १/४ टिस्पून 
पाणी                             २ वाटी
हळदीचे पान                    २
तूप ताटाला लावण्यासाठी 

कृती 
तांदूळ १ तास  पाण्यात भिजवून घ्या. 
मग पंख्याखाली सुकवून घ्या (मसलीन , सुती कपड्यावर ) 
आता सुकलेले तांदूळ मिक्सर मध्ये रवा सारखे बारीक करुन घ्या
चना डाळ पाण्यात  भिजवावे १० मि.
शेंगदाणे चांगले भाजून घ्या , त्याच भांड्यात मूगाची डाळ भाजून घ्या 
आता एक खोलगट कढईत तांदूळ (रवा) तूपात चांगल भाजून घ्या.
खोलगट भांड्यात पाणी तापवून त्यात भिजवलेली चण्याची डाळ व भाजलेली मूगाची डाळ, मीठ घालून उकळून घ्या 
मग त्यात भाजलेले तांदूळ घाला व शिजवून घ्या, पाणी आटल्यावर त्यात किसलेला गूळ घालून एकजीव करुन घ्या 
मग किसलेला नारळ घालून मिश्रणात १ हळदीचे पान घालून वाफवून घ्या २ ते ३ मि.
गॕस बंद करुन शेंगदाणे घाला व एकजीव करुन घ्या.
एका ताटाला तूप  लावून घ्या 
मिश्रण त्यात घालून त्याचे वडीच्या आकार पाडून घ्या व थोडा वेळ सेट करुन घ्या 
तयार खांतोळी हळदीच्या पानावर सजवा

टिप- तांदूळ पीठ होईपर्यंत वाटू नका.
चिक्की गूळ न घेता काळ गूळ घेणे उत्तम 
चवीला आणि दिसायला सुंदर 

Comments