बीटाचा हलवा / शीरा



बीटाचा हलवा /शीरा 






यारीसाठी वेळ १० मि
बनविण्यासाठी वेळ  १५ मि
वाढणीसाठी ३

बीट आपल्या आरोग्याची फार काळजी घेतात रोज बीट खाणे उत्तम. काहींना बीट हा नावडता असतो तर चला त्यांच्यासाठी बीट आवडता करु आपण बीट हलवा

साहित्य 
बीट किसलेला ३ मोठे 
तूप २ मोठे चमचे
दूध १ कप किंवा आवश्यकतेनुसार 
साखर १/४ कप आवडीप्रमाणे 
बदाम ४ ते ५
काजू ३ ते ४
पिस्ता २ ते ३
दूध मसाला १ मोठा चमचा 
कृती 
प्रथम बीट किसून घ्या 
कढईत बीट मंद आचेवर परतवून घ्या थोडासा रंग बदलेल
आता तूप घालून खमंग भाजून घ्या 
व्यवस्थित तूप आणि बीट एकत्र झाल्यावर कोमट दूध घालून मिश्रण एकजीव करुन घ्या 
दूध घालून मिश्रण एकजीव करुन घेतल्यावर थोडावेळ ५ ते ७ मि. झाकण ठेवून वाफवून घ्या 
मग झाकण काढा व्यवस्थित परतवून घ्या 
आता साखर घालून मिश्रण एकत्र करुन घ्या 
साखर घातल्यावर हलव्याला पाणी सुटेल पाणी सूखेपर्यंत चमच्याने हलवत रहा
पाणी सूखल्यावर बदाम, काजू , पिस्त्याचे काप व दूध मसाला घालून मिश्रण एकजीव करुन घ्या 
१ ते २ मि. मंद आचेवर ठेवून द्या 
मग गरमागरम गरम बीट हलवा / शीरा तयार 
बदाम दूध मसाला घालून सजावट करा

टिप-
बीट आधी थोडेसे वाफवून घेतल्यास हलव्याला फार वेळ लागणार नाही.

Comments