फराळी मालपुआ



फराळी मालपुआ






















फराळी मालपुआ

फराळी मालपुआ हा खास उपवासासाठी बनविला आहे अतिशय उत्तम चव अशी...वरीचं आणि सिंगाडा पीठ व वरीचे तांदूळ वापरून हे मालपुआ मस्त तूपात तळून गुळाच्या पाकात तयार केलेले खास फराळी मालपुआ
साहित्य
शिंगाडा पीठ १/२ वाटी
वरीचं पीठ १ मोठा चमचा
वरीचे तांदूळ १ लहान चमचा
मीठ किंचित
पाणी १/४ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
तूप किंवा तेल मालपुआ तळण्यासाठी
गूळ १/३ वाटी
पाणी १ वाटी
बदाम पिस्ते केसर सजावटीसाठी
कृती
प्रथम एक वाडग्यात शिंगाडा पीठ , वरीचे पीठ व किंचित मीठ घालून एकत्र करून घ्यावे
थोडे थोडे पाणी घालावे
व्यवस्थित एकजीव करून त्यात वरीचे तांदूळ घालावे
मिश्रण एकत्र करून १० मिनिटे बाजूला ठेवून द्या
आता खोलगट पण पसरट पॅन किंवा कढईत तेल तापवून घ्या
मिश्रण चांगले एकत्र करून घ्या
आच मध्यम करून त्यात चमच्याच्या साहाय्याने मालपुआ घालून घ्या
दोन्हीं बाजूनी तळून घ्या सोनेरी रंगाचे चांगले खरपूस तळून घ्यावे
अश्याप्रकारे सर्व मालपुआ तळून घ्यावे
पाणी गरम करून त्यात गूळ घालून चांगलं पाक बनवून घ्यावे
गरमागरम मालपुआ गुळाच्या पाकात घालून घ्या व्यवस्थित घोळवून घ्या म्हणजे मालपुआ पाक शोषून घेईल
सर्व मालपुआ पाकातून काढून घ्या एका ताटात ठेवून त्यावर बदाम पिस्ते व केसर घालून सजवा
मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत
टीप
मस्त उपवासासाठी मालपुआ तयार आहेत
पाक जास्त घट्ट व गोड नाही केला आहे हवं असेल तर गुळाचे किंवा साखरेचे प्रमाण वाढवावे

Comments