फराळी घेवर



फराळी / उपवासाचा घेवर























फराळी / उपवासाचा घेवर


फराळी घेवर आणि उपवासासाठी मज्जाच की नाही म्हणजे नेमके उपवासादिवशी तेच खावे वाटते की उपवासाला खाऊ शकत नाही तर आता काही हरकत नाही आपण उपवासाचे घेवर बनऊयात तूपात बर्फाचे खडे घालून तूप फेटून त्यात शिंगाडा व वरीचे पीठ घालून त्यात गार पाणी घालून छानसे पातळ मिश्रण तयार करून ते तुपात किंवा तेलात घेवरचं मिश्रण थोडं थोडं घालत राहा गोलाकार जाळी होईल मग तळून घ्यावे व साखरेचा पाक करून त्यावर घालावे हवं असल्यास दुधाचे रबडी करून त्यावर घालावे मग मस्त खावे
साहित्य
तूप १/३ वाटी
बर्फाचे खडे ३ ते ४
शिंगाडा पीठ १/२ वाटी
वरीचे पीठ १/२ वाटी
तूप किंवा तेल घेवर तळण्यासाठी
साखर १ वाटी 
पाणी १ वाटी
वेलची पूड १/२ चमचा
केसर सजावटीसाठी

कृती
प्रथम एका वाडग्यात तूप घेऊन त्यात बर्फाचे खडे घालून चोळून घ्या
तूप व्यवस्थित घट्ट होइपर्यंत बर्फाचे खडे तुपात फिरवत राहा
छानसं तूप घट्ट झाले की उरलेले बर्फाचे खडे काढून घ्या
तुपाचा रंग पांढरा झाला पाहिजे
आता ह्यात शिंगाडा व वरीचे पीठ घाला त्यात हळू हळू गार पाणी ओतत ढवळत राहा गुठळ्या राहू देऊ नये मिश्रण तयार करा
एका उभट टोपात तूप तापवून घ्या गरम झाले की आच मध्यम करून त्यात मिश्रण लहान चमच्याने थोडं थोडं घालत जा मधोमध सूरीने मिश्रण बाजूला करा जेणेकरून मध्ये गोल खड्डा होईल
भुरकट रंग होइपर्यंत तळायचे आहे छानशी जाळी तयार होऊ द्या झाले की एका जाळीवर काडून घ्या अश्याप्रकारे सर्व घेवर बनवून घ्या
साखरेचा पाक बनवून त्यात वेलची पूड घालून घ्या आणि घेवर वर पाक घाला त्यावर केसर घालून मस्त खा साखरेचा पाक एक तार असावा
हवं असल्यास रबडी सोबत खाऊ शकता
मस्त उपवासाचे फराळी घेवर तयार आहेत
टीप
घेवरच्या मिश्रणाकरिता पाणी गारचं वापरावे

Comments