फराळी कलकल 





फराळी कलकल 



















फराळी कलकल
फराळी कलकल  हे शेंगदाण्यापासून बनविले आहेत कशी ते आपण पाहून घेऊ
साहित्य
भाजलेले शेंगदाणे १ वाटी
हिरव्या मिरच्या २
जिरे १/२ लहान चमचा
शिंगाडा पीठ २ मोठे चमचे
वरीचे पीठ १/३ वाटी
मीठ चवीनुसार
तेल तळण्यासाठी
कृती
प्रथम शेंगदाणे भाजून घ्यावे गार झाले की वरचे साल चोळून काढून टाकावे
मिक्सर च्या जार मध्ये शेंगदाणे वाटून घ्यावे तेल सुटेपर्यंत वाटावे
ह्यात हिरवी मिरची व जिरे घालून वाटावे
वाटून झाल्यावर त्यात शिंगाडा पीठ व वरीचे पीठ घालावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे
चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या
काट्याच्या चमच्याच्या मागच्या बाजूने कलकल तयार करून घ्या
अश्याप्रकारे सर्व कलकल तयार करून घ्या
कढईत तेल तापवून घ्या मग आच मध्यम करून कलकल तेलात तळून घ्या
सोनेरी रंगाचे होइपर्यंत दोन्हीं बाजूंनी तळून घ्यावे
तळलेले कलकक पेपर टिशू किंवा चाळणीत काढा अश्या प्रकारे सर्व कलकल तळून घ्या
कुरकुरीत तिखट असे कलकल तयार आहेत

Comments