शेवगाच्या शेंगांची भजी

शेवगाच्या शेंगांची भजी
























तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविनण्यासाठी वेळ २० मिनिटे
वाढणीसाठी


साहित्य
शेवगाची शेंग उकळून घेतलेली ६ ते ८
बेसन १/२ वाटी
तांदळाचं पीठ १ मोठा चमचा
लाल तिखट १ मोठा चमचा 
गरम मसाला १ लहान चमचा
हळद १/४  लहान चमचा
ओवा १/४ लहान चमचा
हिंग १/४ लहान चमचा
कोथिंबीर बारीक चिरलेली १ लहान चमचा
मीठ चवीनुसार
पाणी गरजेनुसार
तेल तळण्यासाठी

कृती
बेसन आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्या
आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण करून घ्या थोडं जाडसर ठेवा म्हणजे शेवग्याच्या शेंगला व्यवस्थित लागून राहते
शेंग बेसनाच्या मिश्रणात घाला व घोळवून घ्या
कढईत तेल तापवून घ्या मग मध्यम आचेवर शेंग भजी तळून घ्या दोन्ही बाजूनी थोडे लालसर होईपर्यंत तळून घ्या
गरमागरम शेवगाच्या शेंगाची भजी तयार आहे
ही भजी अशीच छान लागते 
 सॉस किंवा चटणी सोबत खाऊ शकता

टिप-
शेवगाच्या शेंगा कोवळ्या असाव्यात
शेवगाच्या शेंगला मध्ये चीर मारू शकता
लाल तिखट ऐवजी हिरवी मिरची वापरू शकता



Comments