झणझणीत शेवभाजी





झणझणीत शेवभाजी


Aarti Nijapkar


















झणझणीत शेवभाजी
साहित्य
तिखट मध्यम जाड शेव १ वाटी
तिखट शेव बारीक वाटलेली पावडर १ लहान चमचा
कांदा १ मोठा आकाराचा
टोमॅटो १ मध्यम आकाराचा
सुखे खोबरं उभे पातळ कापलेले ३/४ वाटी
लसणाच्या पाकळ्या ८ ते १०
आलं २ इंच
धणे १/२ लहान चमचा
जिरे १/२ लहान चमचा
शेवभाजी मसाला १ मोठा चमचा
लाल तिखट १/२  लहान चमचा
हळद १/४ लहान चमचा
कोथिंबीर चिरलेली २ मोठे चमचे
मीठ चवीनुसार
तेल २ मोठे चमचे
(१ लहान चमचा तेल कांदा भाजायला)
पाणी गरजेनुसार

कृती
एका कढईत सुकं खोबरं , धणे व जिरे घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजून घ्या व ताटात काढून ठेवा
कढईत १ लहान चमचा तेल घाला व त्यात कापलेला कांदा घालून मंद आचेवर चांगला लालसर होईपर्यंत भाजून घ्या गॅस बंद करून भाजलेला मसाला गार करून घ्या
आता भाजलेला मसाला , आलं ,लसूण  पाकळ्या ,  सर्व मिक्सर मध्ये घाला व थोडे पाणी घालून मिश्रण बारीक वाटून घ्या
कढईत तेल घालून तापवून घ्या मग आच मध्यम करून त्यात वाटलेला वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या
आता  शेवभाजी मसाला , लाल तिखट , हळद व चवीनुसार मीठ घालून तेल सुटेपर्यंत खमंग परतवून घ्या
मग तिखट शेव बारीक वाटलेली पावडर घाला व मसाला एकजीव करुन घ्या
थोडंसं गरम पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या व २ ते ३ मिनिटे झाकण ठेवून द्या म्हणजे मसल्यातले तेल वर येईल (तरंगेल) मग गरजेनुसार गरम पाणी घालून व्यवस्थित ढवळून घ्या आणि रस्सा चांगला उकळू द्या
रस्सा छान उकळला की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व त्यात तिखट शेव घालून घ्या २  ते ३ मिनिटे उकळी येऊ द्या मग गॅस बंद करा
मस्त , शेवभाजी तयार आहे
हि भाजी लगेचच गरमागरम खावी
शेव रस्साभाजी भाकरी , चपाती सोबत खाऊ शकतो
टीप
शेव भाजी झाली की लगेच गरमागरम खा किंवा जेवणाच्या ५ मिनिटां आधी शेव रश्यात घालून उकळा
आधीच शेव घातली आणि बऱ्याच वेळा नंतर खायला घेतली की त्याचा लगदा होईल
शेवभाजी मसाला नसेल तर काळा किंवा गोडा मसाला वापरू शकता



Comments