मसाला जलजीरा सोडा



मसाला जलजीरा सोडा



Aarti Nijapkar





















मसाला जलजीरा सोडा
साहित्य
सोडा ५०० मिली
लिंबाचा रस ३ मोठे चमचे
जलजीरा पूड १ मोठा चमचा
सेंधा मीठ १ लहान चमचा
पुदिनाची पाने कुस्करलेली ४ ते ५
बर्फाचे तुकडे २ ते ३ किंवा क्रश बर्फ

कृती
काचेचा ग्लासच्या वरचा बाजू ओला करून मसाला मीठ मध्ये उलटा करून फिरवून घ्या म्हणजे वरच्या बाजूला मसाला मीठ लागेल
एक काचेच्या ग्लास मध्ये लिंबाचा रस , जलजीरा पावडर, सेंधा मीठ , कुस्करलेली पुदिनाची पाने व्यवस्थित एकत्र करून घ्या मग क्रश बर्फ घाला
मग हळहळू सोडा घाला फेस आलं की थांबा मग पुन्हा सोडा घाला व लगेचच सर्व्ह करा

Comments