भाताच्या चकल्या






भाताच्या चकल्या





















तयारीसाठी १० मिनिटे



भाताच्या चकल्या

कित्येक वेळा उरलेला शिळा भात कोणी खात नाही किंवा पर्याय म्हणून फोडणीचा भात करतो पण आपण कुरकुरीत तिखट चवीला उत्तम व बघताच संपणारी अशी पाककृती करणार आहोत

साहित्य
उरलेला / शिळा भात १ वाटी
बेसन १/३ वाटी
तांदळाचे पीठ १/४ वाटी
आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
पांढरे तीळ १ लहान चमचा
ओवा १ लहान चमचा
हळद १/४ लहान चमचा
मीठ चवीनुसारलाल 
तिखट १ लहान चमचागरम
 मसाला १ लहान चमचा
धने पूड १/२ लहान चमचा
जिरे पूड १/२ लहान चमचा
मोहन १ लहान चमचा
तेल चकल्या तळण्यासाठी

कृती
प्रथम एक भांड्यात उरलेला/ शिळा भात घ्या तो सुटसुटीत करून घ्यामिक्सरच्या भांड्यात घालून पाणी न घालता बारीक वाटून घ्याभांड्यात काढून त्यात बेसन पीठ , तांदळाचे पीठ, आलं लसूण पेस्ट ,ओवा , पांढरे तीळ , हळद , चवीनुसार मीठ, लाल तिखट , धने जिरे पूड, गरम मसाला , व मोहन घालामिश्रण एकजीव करून घ्याआता चकलीच्या साच्याला आतून थोडं तेलाचे बोटे फिरवून घ्यातयार मिश्रणाचा लांब गोलाकार आकाराचा करून साच्यात घाला व वरून तेलाच्या बोटांनी आत दाबा व साच्याच झाकण लावून घ्यागॅस वर कढईत तेल तापत ठेवा किचन पेपर किंवा पसरत ताट उलटं करून त्यावर थोडं तेल पसरवून घ्या म्हणजे चकल्या चिटकणार नाही सर्व चकल्या पाडून घ्या
तेल तापले की त्यात चकल्या घालून मध्यम आचेवर दोन्हीं बाजूने लालसर / सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यावे
अश्याप्रकारे सर्व चकल्या तळून घ्यावे
मस्त खमंग आणि चवदार अश्या उरलेल्या भाताचे चकल्या खाण्यास तयार आहे
काही वेळातच सर्व चकल्या फस्त होतील


टीप
आलं लसूण पेस्ट आवडीनुसार घालावे पण चवीला उत्तम लागते

Comments