बदाम गनाश केक सोबत चॉकलेट सॉस




बदाम गनाश केक सोबत चॉकलेट सॉस

Aarti Nijapkar














डेझर्ट
बदाम गनाश केक सोबत चॉकलेट सॉस
साहित्य
बटर २०० ग्रॅम
कंडेन्सड मिल्क १/२ कप
व्हॅनिला इसेन्स १ मोठा चमचा
मैदा ३०० ग्रॅम
बेकिंग पावडर १/२ लहान चमचा
बेकिंग सोडा १/४ लहान चमचा
सोडा वॉटर १०० मिली
बदाम पावडर ८० ग्रॅम
दूध १०० मिली
चॉकलेट गनाश साठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट २०० ग्रॅम
फ्रेश क्रीम १०० मिली
सजावट साठी लागणारे साहित्य
भाजलेले बदाम १५ ते २०
पांढरे चॉकलेट वितळवलेले १/४ कप
कृती
ओवन १८०* से वर गरम करा केक टिन घ्या बटर ने किंवा तेलाने ग्रीस करा व बटर पेपर लावा किंवा मैदा शिंपडून घ्या टिन तयार करून ठेवा
मैदा चाळून घ्या एक भांड्यात मैदा , बेकिंग पावडर ,बेकिंग सोडा आणि बदाम पावडर एकत्र करून बाजूला ठेवून द्या
आता एक भांड्यात बटर आणि कंडेन्सड मिल्क एकत्र बीट करून घ्या क्रीम होईपर्यंत करायचे आहे चांगलं  एकत्र करून घ्या व्हॅनीला इसेन्स घालून एकत्र करा
आता एकत्र करून घेतलेले मैदाचं मिश्रण घ्या ते बटरच्या मिश्रणात घालून पुन्हा हलक्या हाताने व्हिस्क करून घ्या थोड थोडं दूध घालावे व मिश्रण एकजीव करून घ्यावे मग सोडा वॉटर घालून मिश्रण एकत्र करून घ्या
मिश्रण व्यवस्थित व्हिस्क करून घ्या
तयार मिश्रण केक टिन मध्ये घालून गरम ओव्हन मध्ये १८०*से वर ३० ते ३५ मिनिटे बेक करून घ्या
केक बेक झालं की नाही बघायला केक टेस्टर ने किंवा वूड पीक ने बघून घ्या टेस्टर साफ आले की समजा आपला केक झाला आहे
तयार झालेला केक ओव्हन मधून काढा व ओव्हन बंद करा आणि केक गार करत ठेवा
चॉकलेट गनाश ची कृती
कुकिंग क्रीम एका खोलगट पॅन मध्ये घालून मंद आचेवर तापवून घ्या सातत्याने ढवळत राहा जेणेकरून जळणार नाही किंवा चिटकणार नाही गॅस बंद करा आता कापलेले डार्क चॉकलेट गरम क्रीम मध्ये घालून घ्या व  एकजीव करून घ्या चॉकलेट गनाश तयार होईल ह्याला थोडा वेळ सेट करून घेऊ म्हणजे साधारण तापमान होईपर्यंत
सफेद चॉकलेट बटर पेपर मध्ये घालून तयार केकवर रेषा मारून घ्या केक च्या बाजूस बदाम लावून घ्या काही वेळ फ्रिज मध्ये सेट करून घ्या
उरलेल्या गनाश मध्ये थोडा दूध घालून मंद आचेवर गरम करून घ्या मग ह्याचा चॉकलेट सॉस तयार होईल हा चॉकलेट सॉस कॅकेच्या बाजूने घाला (गार झाल्यावरच घाला)
आणखी ५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवून सर्व्ह करा बदाम गनाश केक सोबत चॉकलेट सॉस

टीप
फ्रुट सॉल्ट पाण्यामध्ये घाला (सोडा वॉटर च्या ऐवजी)
इलेक्ट्रिक व्हिस्क वापरावे केक छान होतो
चॉकलेट सॉस केक च्या बाजूला न घालता सर्व्ह केल्यावर केकवर घाला

Comments