किवी व्हर्जिन मोहितो



किवी व्हर्जिन मोहितो

Aarti Nijapkar













किवी व्हर्जिन मोहितो

साहित्य

किवी तुकडे २ कप

लिंबाचा रस २ मोठे चमचे

मध २ मोठे चमचे किंवा साखरेचं सिरप

पुदिनाची पाने १० ते १२

क्लब सोडा ३०० मिली

बर्फाचे तुकडे / क्रश

कृती

किवीचे साल काढून तुकडे करा

मिक्सरच्या जार मध्ये(ज्युसर) किवीचे तुकडे घालून फिरवून घ्यावे मग त्याच जार मध्ये पुदिन्याची पाने, लिंबाचा रस व बर्फ घालून पुन्हा फिरवून घ्या
आता आवडता कोणताही काचेचा ग्लास किंवा मोकटेल चा ग्लास घ्या मग त्यात आधी १ ते २ तुकडे बर्फ काही पुदिन्याची पाने मग त्यावर किवी क्रश घाला (मिक्सरमध्ये केलेली क्रश) आवडीनुसार मध किंवा साखरेचं सिरप घाला मग क्लब सोडा घाला ग्लासच्या वर टोकापर्यंत
आणि मस्त थंडगार किवी व्हर्जिन मोजीतो सर्व्ह करा

टीप
किवी फळ उपलब्ध नसतील तर क्रश किंवा सिरप वापरू शकता

Comments