स्पायसि कलिंगड मोहितो




स्पायसि कलिंगड मोहितो

Aarti Nijapkar



















स्पायसि कलिंगड मोहितो

साहित्य

कलिंगड ज्यूस १/२ कप

पुदिन्याची पाने ५ ते ६

हिरवी मिरची १/२ लहान

लिंबाचा रस १ लहान चमचा

साखर १ मोठा चमचा

क्लब सोडा २०० मिली

बर्फाचे तुकडे ३ ते ४

सजावटीसाठी

कलिंगडचा तुकडा १

लिंबू गोलाकार काप १

हिरवी मिरची १

कृती

मिक्सरच्या जार मध्ये पुदिन्याची पाने, हिरवी मिरची, लिंबाचा रस ,साखर थोडेसे फिरवून घ्या
आता मोकटेल शेकर मध्ये प्युरी ,बर्फाचे तुकडे ,कलिंगड ज्यूस घालून व्यवस्थित शेक करून घ्या किंवा सर्व साहित्य एक भांड्यात घेऊन मिश्रण एकजीव करून घ्या
आवडत्या किंवा मोकटेल ग्लासमध्ये घालून त्यावर क्लब सोडा घाला व एकत्र करून घ्या
कलिंगडचा तुकडा , लिंबाचा गोलाकार काप, मध्ये चिरलेली हिरवी मिरची ह्यांनी सजावट करा
कलिंगड ज्यूस बनविण्यासाठी कलिंगड कापून त्यातले बिया काढून टाका व मिक्सरच्या जार मध्ये घालून त्याची प्युरी करून घ्या

थंडगार लगेचच सर्व्ह करा







Comments