मेथी पालक क्रिस्पी






मेथी पालक क्रिस्पी


Aarti Nijapkar
















साहित्य
गव्हाचे पीठ १ वाटी
तांदुळाचे पीठ १ मोठा चमचा
पालक बारीक चिरलेली १/३ वाटी
मेथी बारीक चिरलेली १/४ वाटी
कोथिंबीर बारीक चिरलेली १ मोठा चमचा
हिरवी मिरची १ लहान
पांढरे तीळ १ मोठा चमचा
ओवा १/२ लहान चमचा
मीठ स्वादानुसार
लाल तिखट १ लहान चमचा
हळद १/३ लहान चमचा 
गरम मसाला १/४ लहान चमचा
पाणी आवश्यकतेनुसार
तेल तळण्यासाठी

कृती
एका खोलगट भांड्यात चिरलेली पालक , मेथी , हिरवी मिरची ,कोथिंबीर, लाल तिखट , हळद , गरम मसाला , तीळ , ओवा ,मीठ सर्व एकत्र करून घ्या
आता गव्हाचं पीठ व तांदळाचे पीठ घाला आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यमसर कणिक मळून घ्या  व ८ ते १० मिनिटे झाकून ठेवा
गॅसवर कढईत तेल घालून मध्यम आचेवर तापवत ठेवा
कणकेचे गोळे घेऊन थोडंस सुके पीठ लावून पातळ लाटून घ्या मग आवडत्या आकाराच्या कटर ने कापून (कट) करून घ्या
तेल तापले की त्यात घालून मध्यम आचेवर लालसर होईपर्यंत तळून घ्या तळलेले क्रिस्पी किचन पेपर किंवा चाळणीत काढावे म्हणजे जास्तीचं तेल निघेल
अश्याप्रकारे सर्व क्रिस्पी बनवून तळून घ्या
पालक मेथी क्रिस्पी तयार आहेत हवाबंद डब्यात भरून ठेवा दोन दिवस खाऊ शकतो

टीप
जास्त दिवस ठेवायचे असतील तर गव्हाचे पीठ न वापरता तांदळाचे पीठ वापरावे
तिखट नको असेल तर मिरची व लाल तिखट न घालता थोडीशी काळीमिरी पूड घालावी

Comments