वांग्याचं भरीत



वांग्याचं भरीत


Aarti Nijapkar



भरताचं वांग १ मोठं

लसूण पाकळ्या ८ ते १०

कांदा १ मोठा

टमाटर १ मध्यम

हिरवी मिरची १

भाजलेल्या लसणाची पाकळ्या ५ ते ६

वांग्याला वरून लावायला २ चमचे तेल

कोथिंबीर १ मोठा चमचा

तेल २ मोठे चमचे

जिरे १/२ लहान चमचा

मोहरी १/२ लहान चमचा

हिंग १/४ लहान चमचा

हळद १/२ लहान चमचा

जिरे पूड १ लहान चमचा

धणे पूड १ लहान चमचा

काळा मसाला १ लहान चमचा

कांदा लसूण मसाला २ चमचे

मीठ चवीनुसार


कृती

प्रथम वांग धुऊन पुसून घ्या मग मध्ये थोडे चीर मारा त्यात एक करून सर्व बाजूने लसणाच्या पाकळ्या आत घाला व त्यावर तेलाचा हात फिरवून गॅस वर मध्यम आचेवर सर्व बाजून भाजून घ्या



सर्व बाजूने वांग छानसं भाजून घ्या मग गॅस बंद करून वांग एका ताटात काढून घ्या व अलगद हाताने त्यावरचे साल आवरण काढून टाका



वांग्याचं देठ काढून सुरीने बारीक करा व फोडणीचे साहीत्य कांदा टमाटर हिरवी मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्या



कढईत तेल घालून तापवून घ्या आच मध्यम करून त्यात जिरे मोहरी हिंग घाला व लगेचच बारीक कापलेलं लसूण घालून थोडं लालसर होईपर्यंत परतवून घ्या व त्यात कापलेल्या मिरच्या घालून पुन्हा परतवून घ्याआता कांदा आणि टमाटर घालून परतवून घ्या त्यात हळद आणि चवीनुसार मीठ घालून कांदा चांगलं वर तेल सुटेपर्यंत परतवून घ्या
त्यात सर्व सुखे मसाले घालून एकत्र करून घ्याआता वांग्याचं भरीत म्हणजे बारीक केलेलं वांग मसाल्यात घालून एकजीव करून घ्याबारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करून ५ ते ७ मिनिटे वाफवून घ्याअश्यापद्धतीने मस्त असं वांग्याचं भरीत तयार आहे 

वांग्याचं भरीत कोणत्याही भाकरी सोबत छान लागते चपतीसोबतही खाऊ शकता

Comments