पौष्टिक कटलेट्स



पौष्टिक कटलेट्स


Aarti Nijapkar
Aarti Nijapkar

















पौष्टिक कटलेट्स

लहान मुलांना फारश्या भाज्या काही आवडत नाही तर अश्या भाज्यांचं मिश्रण करून छानसे कटलेट्स केले की केचप किंवा चटणीसोबत नक्की आवडीने खातील 
बर्गर मध्ये हे कटलेट्स टिक्की म्हणून सुद्धा मुलांना देऊ शकता

साहित्य 
भोपळी मिरची बारीक चिरलेली १ मोठी
उकडलेला बटाटा १ मध्यम
वाफवलेले मटार १/३ वाटी
दुधी भोपळा १/४ वाटी
गाजर बारीक चिरलेले १/३ वाटी
बीट बारीक कापलेले १/४ वाटी
कोथिंबीर १ मोठा चमचा
हिरवी मिरची १
मीठ चवीनुसार
गरम मसाला १ लहान चमचा
लाल तिखट १ लहान चमचा
हळद किंचित
कोर्न फ्लोअर १ मोठा चमचा
ब्रेड क्रम्ब २ मोठे चमचे
तेल तवा फ्राय साठी

कृती 
सर्व कापलेल्या भाज्या कोथिंबीर व हिरवी मिरची व उकडलेला बटाटा व वाफवलेले मटार घ्या
आता सर्व कापलेल्या भाज्या वाफवलेले मटार एकत्र करून  बटाटा कुस्करून घ्या
मग त्यात सर्व मसाले घाला चवीनुसार मीठ , कोर्न फ्लोअर व ब्रेड क्रम्ब घालून मिश्रण एकजीव करून घ्या
मग मध्यम मिश्रण घेऊन दाबून कटलेट चा आकार द्या व ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून घ्या सर्व बाजुंनी लावून घ्या अश्या प्रकारे सर्व कटलेट तयार करून घ्या
तवा तापवून त्यावर थोड तेल पसरवून घ्या अगदी कमी तेल मग कटलेट मध्यम आचेवर भाजून घ्या
दोन्ही बाजूने सोनेरी रंग व कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
छान कुरकुरीत होतील असे भाजून घ्या
गरमागरम पौष्टिक कटलेट तयार आहेत
सॉस सोबत किंवा चटणी सोबत खाऊ शकता

टीप
भाज्या कच्याच घ्या (वाफवलेले नको) तव्यावर त्या चांगल्या शिजतात आणि चवही छान लागते

Comments