अननस टी केक


अननस टी केक
























अननस टी केक
साहित्य
बटर १०० ग्रॅम
साखर पावडर १०० ग्रॅम
अंडी २
अननस एस्सेन्स ४ ते ५ थेंब
मैदा १०० ग्रॅम
बेकिंग पावडर १ टीस्पून
अननस क्रश १/३ कप
दूध १/३ कप

कृती

प्रथम केक चा टिन ग्रीस करून ठेवा
ओव्हन १८०*c वर गरम करा (Preheat)
एका खोलगट भांड्यात मऊ बटर विस्क (फेटून) करून घ्या त्यात साखर घालून व्यवस्थित विस्क करून घ्या
आता एक अंड घालून विस्क करा पुन्हा दुसरं अंड व अननस एस्सेन्स घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या
मैदा आणि बेकिंग पावडर व अननस क्रश घालून मिश्रण एकजीव करा
त्यात गरजेपुरते दूध घालून मिश्रण विस्क करून घ्या
तयार मिश्रण केक च्या टीन मध्ये घालून टॅप करा (थोडं आपटा)
गरम झालेल्या ओव्हन मध्ये १८०*c ला १० ते १५ मिनिटे बेक करा
केक शिजत आला की सुगंध येतो तर सूरी किंवा स्कीव्हर्स किंवा केक टेस्टर ने बघा
ओव्हन मधून केक बाहेर काढून थोडं गार करून घ्या किंवा गरमागरम केक सुद्धा छान लागतो

टीप

जर ओव्हन नसेल तर तुम्ही खोलगट कढई किंवा कुकर मध्ये बेक करू शकता

Comments