बटाटा वडा




बटाटा वडा















तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी वेळ ३० ते ३५ मिनिटे
वाढणीसाठी ३

बटाटा वडा म्हणजे आपल्या मुंबईची शान आहे. सर्वांना आवडणारा हा बटाटा वडा मुंबईचा आवडता असं खाद्य आहे

आज आपली रेसिपी आहे बटाटा वडा अगदी सोपी रेसिपी आहे बटाट्याची भाजी  करून मग बेसनाच्या मिश्रणात घोळवून तेलात तळून घ्यायचे आहेत

साहित्य
बटाटा वडा साठी
बटाटे २ ते ३ मोठे उकडलेले
तेल १ मध्यम चमचा
जिरे १/२ लहान चमचा
मोहरी  १/२ लहान चमचा
कडीपत्ता ७ ते ८ पाने
हिंग १/३ लहान चमचा
लसूण पाकळ्या ५ ते ६
आलं १/२ इंच
हिरवी मिरची १ ते २
कोथंबीर १ मोठा चमचा आवडीनुसार
मीठ चवीनुसार
हळद  १ मध्यम चमचा
बटाटा वड्याच्या आवरणासाठी
बेसन १ वाटी
चवीनुसार मीठ
हळद १/३ लहान चमचा
पाणी गरजेनुसार

कृती
प्रथम बटाटे उकडून घ्या उकडलेल्या बटाट्याचे साल काढून मग लहान चौकोनी आकारात कापा किंवा कुस्करून घ्या गॅसवर कढई तापवुन त्यात तेल घालून तापवून घ्याआच मध्यम करून त्यात जिरे मोहरी मोहरी कढीपत्ता लसुन आलं घालून व्यवस्थित परतून घ्या त्यात हिंग घाला चिरलेली हिरवी मिरची चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घ्या त्यात कापलेल्या किंवा कुस्करलेले बटाटे घालून हळद चवीनुसार मीठ घालून  मिश्रण एकजीव करून घ्या कोथिंबीर वरून घाला ३ ते ४  मिनिट झाकण लावून वाफवून घ्या
 गॅस बंद करुन तयार बटाटा वड्याची भाजी एका ताटात काढून गार होण्यासाठी ठेवून द्या
गार झाल्यावर मध्यम सर किंवा आवडीनुसार गोळे करून घ्या

बटाटा वडा च्या आवरणासाठी एका भांड्यात बेसन चवीनुसार मीठ व हळद घाला त्यात गरजेनुसार पाणी घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या त्यात घूटळे अजिबात राहू देऊ नये बेसनाचे मिश्रण आपल्याला सतत ५ ते ६ मिनिटे फेटत राहायचे आहे यामुळे बटाटा वड्याचे वरचे आवरण छान फुलून येते
(टीप: बटाटा वड्याच्या आवरणासाठी मिश्रण हे घट्टसर असावे)

गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घाला तेल पूर्णपणे तापवून घ्या तेल कडकडीत तापले की आच मध्यम करा मग बटाटा वड्याची गोळे बेसनाच्या मिश्रणात घोळवून एक एक करून तेलात सोडा मग मध्यम आचेवर बटाटे वडे छान तळून घ्या तळलेले बटाटेवडे चाळणीत किंवा किचन पेपर वर काढा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल अशाप्रकारे सर्व बटाटेवडे तेलात खमंग तळून घ्यावे

मस्त गरमागरम बटाटेवडे तयार आहेत लाल सुकी चटणी हिरवी चटणी किंवा चिंच गुळाची चटणी सोबत आपण खाऊ शकतो

 टीप
 बटाट्याच्या भाजी मध्ये आलं लसूण नको असेल तर कमी  करू शकता
बेसनामध्ये बेकिंग सोडा घालत असाल तर अगदी किंचित घालावे पण बेकिंग सोडा ची काहीही आवश्यकता नाही





Comments