लादी पाव

लादी पाव

तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी वेळ १ तास
वाढणीसाठी ४
पाव घरच्याघरी अगदी बेकरीत भेटतो तसा करता येतो तर आपण पाव कसे बनवायचे ते पाहणार आहोत
पाव
साहित्य
मैदा ३ वाटी
ड्राय यीस्ट ५ लहान चमचे
कोमट दूध १/४ वाटी
साखर २ लहान चमचे
बटर १ मोठा चमचा
मीठ १/३ लहान चमचा
पाणी १/२ वाटी गरजेनुसार
तेल १ मोठा चमचा
लहान चमचा - TSP
मोठा चमचा - TBSP
कृती
एका वाटीत ड्राय यीस्ट थोडी साखर घालून त्यात १/४ वाटी कोमट दूध घालून चमच्याने ढवळून घ्या व त्यावर जाड कापड ठेवून झाकण ठेवा (ह्याने लवकर यीस्ट प्रूव्ह होते म्हणजे फुगून वर येते )
दुसऱ्या खोलगट भांड्यात किंवा पसरट परातीत मैदा चाळून घ्या त्यात मीठ , साखर पावडर व बटर घालून हलक्या हाताने एकत्र करून घ्या
यीस्ट प्रूव्ह झाले असेल तर मैद्याच्या मिश्रणात घालून एकत्र करून घ्या
गरजेनुसार पाणी  घालून व्यवस्थित सैलसर मळून घ्या १० ते १२ मिनिटे हे पीठ मळून घ्यायचे आहे
थोडं तेल वरून घालून गुळगुळीत होईल असे मळून घ्या
पिठाचा गोळा करा एका हातात घेऊन त्या भांड्याच्या तळाला थोडं तेल लावून मग पिठाचा गोळा ठेवून त्यावर जाड टॉवेल किंवा झाकण ठेवून ३५ मिनिटे दमट ठिकाणी प्रूव्ह करण्यास ठेवून द्या
आता पीठ वरपर्यंत फुगून आले

असेल तर हाताच्या बोटानी त्यातील हवा काढून न मळता अलगद हाताने गोळा करून घ्या
मग कटर किंवा सुरीने कापून न मळता अलगद हाताने आतल्या बाजुने वळवत गोळा करून घ्या
तेलाने ग्रीस केलेल्या ट्रेवर हे गोळे ठेवून द्या त्यावर तेलाचा ब्रश करावा म्हणजे वरचा भाग फाटणार नाही
त्यावर जाड कापड झाकून १५ ते २० मिनीटे पुन्हा प्रूव्ह करण्यास ठेवावे
(केलेले गोळे वर फुगून आले पाहिजे)

ओव्हन तापवून घ्या (Preheat ) करून घ्या
पावाच्या गोळ्याला हलक्या हाताने दुधाचा वॉश म्हणजेच ब्रश करून घ्या मग ट्रे ओव्हन च्या आत ठेवून २०० से * वर ठेवून १० ते १५ मिनिटे बेक करून घ्या
बेक झाल्यावर ट्रे बाहेर काढून लगेचच त्यावर बटर किंवा तेलाचा ब्रश करावा आणि थोडावेळ कोमट होण्यास ठेवावे मग पाव वेगळे करून घ्या (कोमट केल्याने हे पाव छान नरम होतात)
हे पाव खाण्यास तयार आहेत

टीप
पीठ व्यवस्थित मळून झाले आहे कि नाही हे कसे ओळखायचे तर मळून झालेल्या पिठाचा लहान गोळा घेऊन अलगत गोलाकार करून थोडासा पसरवून बघा पीठ फाटत नसेल तर व्यवस्थित मळले गेलॆ आहे
ओव्हन नसेल तर खोलगट कढईत करू शकता म्हणजे कढईत खाली उंच जाळी किंवा रिंग ठेवा मग कढईत मावेल अशी प्लेट घ्या त्यात हे पावाचे गोळे प्रूव्ह करून घ्या मग गरम केलेल्या कढईत प्लेट ठेवून त्यावर झाकण ठेवून बेक करून घ्या

Comments