चिकन टिक्का


चिकन टिक्का




















मांसाहारी स्टार्टर 
तयारीसाठी वेळ १५ मिनिटे 
बनविण्यासाठी वेळ १ तास ३० मिनिटे 
वाढणीसाठी ३ जण 
चिकन टिक्का
चिकन टिक्का माझा तर खुपच आवडता स्टार्टर आहे म्हणजे ह्याला पर्याय नसतो तर अगदी घरच्या घरी  रेस्टॉरंट सारखा चवीला आणि उत्तम अशी रेसिपी तुम्हा सर्व खवय्यांसाठी 
चिकन टिक्का
साहित्य
पहिलं मॅरीनेशन
चिकन बोनलेस ५०० ग्रॅम
मीठ १/२ लहान चमचा
लाल मिरची पूड १ लहान चमचा
लिंबाचा रस १ मोठा चमचा
दुसरं मॅरीनेशन
राईचं तेल १/४ वाटी
काश्मिरी लाल तिखट १ मोठा चमचा
गरम मसाला १ लहान चमचा
काळीमिरी पूड १/२ लहान चमचा
काळं मीठ १/३ लहान चमचा
घट्ट दही १/२ वाटी
कसुरी मेथी १ मोठा चमचा
धणे जिरे पूड १ लहान चमचा
आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा
बटर गरजेनुसार
चवीनुसार मीठ 
कृती
 प्रथम बोनलेस चिकन पाण्यात धुऊन घ्या त्यातले पाणी पुसून घ्या
मग त्यात मीठ लाल तिखट लिंबाचा रस घालून एकत्र करून घ्या दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या
आता एका भांड्यात तेल लाल काश्मीरी मिरची पूड गरम मसाला काळी मिरी पूड  काळमीठ घट्ट दही व चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या 
आता हे दह्याचं मिश्रण चिकन मध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या 
धने-जिरेपूड आलं-लसूण सर्वांना लागेल असं मिश्रण एकत्र करून घ्या मग यावर झाकण ठेवून ३० मिनिटे ठेवून द्या 
गॅस वर ग्रिल पॅन ५ मिनिटे मोठ्या आचेवर तापवून घ्या 
मग किचन ब्रशने किवा चमच्याच्या साहाय्याने तेल लावून घ्या 
आच कमी न करता त्यावर मॅरीनेशन केलेले चिकनचे तुकडे थोड्या थोड्या अंतरावर ठेवून द्या 
चिकन मोठ्या आचेवरच ३ ते ४ मिनिटे राहू द्या 
आता सर्वे चिकनचे तुकडे पलटवून घ्या 
कमी आचे करून १२ ते १५ मिनिटे  चिकन ग्रील  होऊ (शिजू)  द्या
 चिकन व्यवस्थित ग्रील झाल्यावर वरून बटर लावा म्हणजे चिकन मऊ व लुसलुशीत राहतील 
अशाप्रकारे चिकन टिक्का स्टार्टर हे तयार आहे 
त्यावर थोडेसे चाट मसाला वरून घाला  किंवा आवडीनुसार 
चिकन टिक्का स्टार्टर हिरव्या चटणी सोबत खा
टीप 
चिकन  टिक्का साठी दोन मॅरीनेशन हे गरजेचे आहे
दही घट्टच घ्यावे
राईच्या तेला ऐवजी तुम्ही रोजच्या वापरातील तेल  वापरू  शकता
काळ्या मिठाचा वापर प्रमाणातच करावा



https://youtu.be/EOl93kR4Rw0


Comments