मुगाच्या डाळीची मसाला स्टिक



मुगाच्या डाळीची मसाला स्टिक
















तयारीसाठी वेळ
बनविण्यासाठी वेळ १ तास
वाढणीसाठी ३
मुगाच्या डाळीची  मसाला स्टिक

साहित्य 
मुगाची डाळ १ वाटी 
तांदळाचे १/२ अर्धी वाटी
लाल तिखट १ मोठा चमचा (Tbsp)
धनेजिरे पूड १ लहान चमचा 
हिंग १/४ लहान चमचा 
ओवा १/२ लहान  चमचा 
कलौंजी १ लहान  चमचा
कसूरी मेथी १ मोठा चमचा  (Tbsp)
हळद १/२ लहान चमचा
चवीनुसार मीठ
तेल २ चमचा  (Tbsp)
काळे मीठ चिमुटभर
तेल तळण्यासाठी

कृती
प्रथम मुगाची पाण्यात धुऊन  डाळ ४ ते ५ तास पाण्यात भिजत ठेवा 
मुगाची डाळ  मिक्सरमध्ये घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्या (पाणी न घालता मुगाची डाळ वाटून घ्या) वाटलेल्या मुगाच्या डाळीत तांदळाचे पीठ , हिंग,लाल तिखट, धने-जिरेपूड, ओवा, कलौंजी , कसूरी मेथी हळद , चवीनुसार मीठ , दोन चमचे तेल,  काळे मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून मिश्रण एकजीव करून घ्या (पाण्याची काही आवश्यकता नाही) 
आपण वाटून घेतलेली आहे त्यामुळे गरज असेल  तरच पाण्याचा वापर करावा अन्यथा पाण्याची गरज लागत नाही 
पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर आठ ते दहा मिनिटे झाकून ठेवा
आता पिठाचा व्यवस्थित गोळा करून घ्या 
थोडे तांदळाचे पीठ शिंपडून व्यवस्थित मध्यमसर लाटून घ्या 
लाटून झाल्यावर सुरीने किंवा रोलर कटरने स्टिक कापून घ्या 
कढईत तेल घालून तेल तापवून घ्या 
आता कापलेले स्टिक तेलात घालून आच मध्यम करून दोन्ही बाजूने व्यवस्थित सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या 
अशाप्रकारे सर्व मसाला स्टिक  तेलात व्यवस्थित तळून घ्यावे 

टीप 
येथे  तांदळाचे पीठ वापरले आहे यात हवं असेल तर  गव्हाचे पीठ वापरू शकता 
आलं-लसूण पेस्ट घालू शकता

Comments

Post a Comment