जिलेबी








जिलेबी
साहित्य
मैदा १ वाटी
पाणी १/३ वाटी किंवा गरजेनुसार
फ्रुट सॉल्ट १ लहान चमचा
तेल तळण्यासाठी
जिलेबी पाडायला पायपिंग बॅग किंवा जिलेबी साचा
पाक बनविण्यासाठी
साखर १ वाटी
पाणी २ वाटी
लिंबाचा रस १ थेंब
खाण्याचा रंग पिवळा किंवा आवडीनुसार

कृती
एका एका भांड्यात चाळलेला मैदा  घ्या त्यात थोडं थोडं करून गरजेनुसार पाणी घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
हे मिश्रण फार घट्ट व पातळ नसावे मिश्रण फेटून झाल्यावर बाजूला ठेऊन द्यावे
आता खोलगट भांडे किंवा खोलगट पॅन ठेवून त्यात साखर व पाणी घालून  घ्या साखर पूर्णपणे विरघळली की त्यात खाण्याचा रंग व एक थेंब लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्या
हे पाक बाजूला ठेवून द्या
आता कढईत तेल तापवून घ्या पायपिंग बॅग मध्ये किंवा जिलेबी साचा ( हे दोन्ही नसेल तर घरी असलेले दुधाची पिशवी व्यवस्थित पाण्याने धुऊन घ्या मग ती पूर्णपणे सुकवून त्यात हे मिश्रण घालून घ्या) मग पुढच्या बाजूने कात्रीने कापून घ्या
तेल पूर्णपणे तापल्यावर आच मध्यम करून त्यात जिलेबी पाडून घ्या मग दोन्ही बाजूने खरपूस  तळून द्या झाल्यावर हे जिलेबी पाकात घाला थोड्या मुरु द्या मग दुसऱ्या एका ताटात काढून द्या अशाप्रकारे सर्व जिलेबी बनवून घ्या

टीप
जिलेबीच्या मिश्रणात दही किंवा बेकिंग सोडा बेकिंग पावडर घालून जिलेबी करतो पण ह्यात आपण फ्रुट सॉल्ट म्हणजेच इनो घालून  केलं आहे


https://youtu.be/ikXmd4b58QA


Comments