खुरसनी सुखी चटणी

खुरसनी सुखी चटणी
तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी वेळ १५ मिनिटे 
खुरसनी   / कारळे हे आपल्या शरीराला खूप उपयुक्त  घटक आहे खुरसनी  आणि खुरसनी   तेल ह्या दोन्हीचा आपल्या रोजच्या जेवणात वापर केला पाहिजे 
खुरसनी  सुखी चटणी  चवीला उत्तम लागते हि सुखी चटणी  तोंडी लावण्यासाठी किंवा भाजीत घालू शकतो जसे कि वांग्याच्या, गवारीची , शेवगाच्या शेंगा , पापडीची अश्या अनेक भाज्यांमध्ये घालू शकतो 
साहित्य 
खुरसनी  १ वाटी 
पांढरे तीळ १/३ वाटी 
लसूण पाकळ्या १/२ वाटी 
लाल सुख्या मिरच्या ५ ते ६ किंवा आवश्यकतेनुसार 
हिंग १/३ लहान चमचा 
मीठ चवीनुसार 
तेल १ लहान चमचा लसूण पाकळ्या परतवून घेण्यासाठी
कृती 
खुरसनी व्यवस्थित साफ करून ते चाळून घ्या (कारण काहीवेळेस त्यात अगदी बारीक खडे किंवा काळी माती असते चाळल्यावर ते साफ होते)
तवा तापवून त्यात खुरसनी घालून मध्यम आचेवर व्यवस्थित भाजून घ्या भाजून झाल्यावर एका ताटात काढून घ्या
आता पांढरे तीळ घालून थोडे लालसर भाजून घ्या भाजल्यावर तेही ताटात काढून घ्या
लाल सुख्या मिरच्या परतवून घ्या
तव्यावर १ लहान चमचा तेल घालून त्यावर लसणाच्या पाकळ्या लालसर परतवून घ्या लसूण छान परतवून झाले कि त्यात हिंग घालावे व गॅस बंद करावे सर्व ताटात काढून घेतल्यावर भाजलेले साहित्य गार होऊ द्या
गार झाले कि त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या
मग एका बरणीत काढून ठेवा
वरण भात किंवा आवडीनुसार खाऊ शकता
टीप
सुख्या मिरचीच्या ऐवजी लाल तिखट वापरू शकता 

























Comments