आलू भुजिया

आलू भुजिया
Aarti Nijapkar





























तयारीसाठी १५ मिनिटे
बनविण्यासाठी वेळ ३० मिनिटे

आलू भुजिया घरच्याघरी मस्त अशी आणि लवकर होणारी आहे अगदी आपण आलू भुजिया बाहेर विकत घेऊन खातो त्याच चवीची ही आलू भुजिया आहे...तर आता बाहेरून विकत न घेता घरच्याघरी बनवायला काही हरकत नाही
साहित्य
उकडलेले बटाटे ३ मध्यम आकाराचे
बेसन १ वाटी
चाट मसाला किंवा आमचूर पावडर १ मोठा चमचा
लाल तिखट १ मोठा चमचा
हळद १/२ लहान चमचा
हिंग १/३ लहान चमचा
सेंधा मीठ १/३ लहान चमचा
मीठ चवीनुसार
तेल भुजिया तळण्यासाठी
कृती
बटाटे पूर्णपणे शिजवून/ उकडवून घ्या
गार झाल्यावर त्याची साल काढून बटाटे किसून घ्या किंवा कुस्करून घ्या
एका भांड्यात किंवा परातीत कुस्करलेले बटाटे , बेसन , चाट मसाला , लाल तिखट , हळद , हिंग , सेंधा मीठ व चवीनुसार मीठ घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या
पाण्याचा वापर करायचा नाही
मिश्रण मळून झाले की त्यावर ७ ते ८ मिनिटे झाकण ठेवून द्या
कढईत तेल घालून तापवून घ्या
साच्याला आतून थोडे तेलाचा हात फिरवून घ्या त्यात बारीक शेवेची प्लेट ठेवून द्या
मिश्रण साच्यात मावेल तेवढा गोळा घेऊन मग उभट गोलाकार करून साच्यात घालून साचा बंद करून कढईत भुजिया सोडावे मग मध्यम आचेवर तळावे रंग खूप लालसर करायचा नाही अश्याप्रकारे सर्व भुजिया पाडून तळून घ्यावे
चाळणीत किंवा किचन पेपर वर काढा म्हणजे तेल राहणार नाही
टीप
-झणझणीत आलू भुजियासाठी तळून झाल्यावर वरून चाट मसाला व थोडी लाल तिखट भुरभुरावे
-चाट मसाला ऎवजी आमचूर पावडर घालू शकता
-बटाटे पूर्णपणे शिजलेले किंवा  कुस्करलेले पाहिजे नाहीतर साच्यातून मिश्रण व्यवस्थित पडत नाहीत

Comments