चिकन चीझ पिझ्झा

चिकन चीझ पिझ्झा

तयारीसाठी वेळ १५ मिनिटे
बनविण्यासाठी वेळ ४५ मिनिटे
वाढणीसाठी २
चिकन चीझ पिझ्झा
पिझ्झा बेस
साहित्य
मैदा १ वाटी
यीस्ट १ लहान चमचा
साखर १ लहान चमचा
दुधाची पावडर १ मोठा चमचा
बटर १ मोठा चमचा
मीठ चिमूटभर
पाणी १/३ वाटी किंवा गरजेनुसार
 टॉपिंग
पिझ्झा सॉस
मसाला चिकन
मोझरेला चीझ / पिझ्झा चीझ
मिक्स हर्ब्स
बटर
टॉपिंग
चिकन १/२ वाटी आधी गरम पाण्यात शिजवून घ्या मग त्यातले पाणी काढून चिकन shredded करून घ्या म्हणजे त्याचे लांब पातळ असे करून घ्या मग त्यात लिंबाचा रस १/३ लहान चमचा , थोडंस मीठ , मिरी पूड १/३ लहान चमचा ,लाल तिखट १/२ लहान चमचा ,जिरे पूड १/३ लहान चमचा घालून एकत्र करून घ्या
गॅसवर तवा तापवून त्यात १ लहान चमचा बटर आणि १/२ लहान चमचा तेल घाला मग त्यात चिकन घालून परतवून घ्या
पिझ्झा सॉस
पिझ्झा सॉस नसेल तर टोमॅटो केचप १/२ वाटी त्यात १ मोठा चमचा किंवा आवडीनुसार मिक्स हर्ब्स किंवा पिझ्झा मसाला घालून एकत्र करून घ्या
पिझ्झा किसून घ्या व फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घ्या
कृती
प्रथम एका वाटीत कोमट दूध घेऊन त्यात एक लहान चमचा थोडी साखर घालून मिश्रण थोडे ढवळून घ्या व त्यावर झाकण ठेवून आठ ते दहा मिनिटे झाकण ठेवून द्या प्रूविंगसाठी
एका भांड्यात चाळून घेतलेला मैदा त्यात बारीक साखर किंचित मीठ , दुधाचे पावडर, बटर सर्व घालून मिश्रण एकत्र करून घ्या आता त्यात प्रूव झालेलं यीस्ट घालून मिश्रण हाताने एकत्र करून घ्या मग त्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ थोड सैलसर मळून घ्या पुन्हा थोडं बटर घालून पीठ मळून घ्या (पिठाला छानशी चमक आली पाहिजे)
त्यावर झाकण ठेवून दमट जागेवर १० मिनिटे ठेवून द्या
प्रूविंग साठी म्हणजे पीठ फुगून वर येईल व हलका होईल
आता प्रूविंग झालेल्या पिठाला वरून उलट्या चार बोटांनी प्रेस करा म्हणजे हलक्याने दाबून घ्या त्याचा गोळा करा  हलक्या हाताने आतल्या बाजूला पीठ मळून त्याचा गोळा करून घ्या
(मी केक टिन मध्ये पिझ्झा बेक केला आहे)
पिझ्झा प्लेट असेल तर त्याला पूर्णपणे बटर लावून घ्या त्यावर मैदा भुरभुरून घ्या किंवा मक्याचे पीठ (कॉर्न स्टार्च नाही) त्यावर गोळा ठेवून बोटांना वितळलेले बटर लावून गोलाकार पसरवून घ्या मध्यमभागी थोडं पातळ आणि बाजुंनी थोडं जाडसर ठेवावे त्यावर टोचे मारून घ्या मी काट्याच्या चमच्याने (fork) ने टोचे मारले आहे मग त्यावर जाड कापड /किचन टॉवेल किंवा झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे प्रूविंग साठी ठेवून द्या
ओव्हन १८०* से ला तापवून घ्या
प्रूविंग झाल्यावर थोडं वितळलेले बटर लावून घ्या मग पिझ्झा सॉस लावून घ्या अगदी हलक्या हाताने करायचे आहे कारण पिझ्झा बेस प्रूव झाला आहे मग त्यावर चिकन पसरवून त्यात हवे तेवढे आवडीनुसार किसलेलं चीझ पसरवून घाला
गरम झालेल्या ओव्हन मध्ये ठेवून २००*से ला बेक करून घ्या
अश्याप्रकारे घरच्याघरी चिकन चीझ पिझ्झा तयार आहे गरमागरम सर्व्ह करा


टीप
चिकन ऐवजी तुम्हांला हवं असेल त्या टॉपिंग घालू शकता
व्हेज खाणाऱ्यानी व्हेज टॉपिंग घालावे
ओव्हन नसेल तर कुकर किंवा कढईत पिझ्झा बेक करू शकता

Comments