कलिंगडाच्या सालीच्या रंगीत टूटी-फ्रूटी

कलिंगडाच्या सालीच्या रंगीत टूटी-फ्रूटी

तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी १ तास
उन्हाळ्यात बाजारात कलिंगड खूप जास्त प्रमाणात येतात तर कलिंगड प्रत्येकाच्या घरी आणलेच जाते त्यातला लाल गर आवडीने खातो मात्र त्याचे साल आपण टाकून देतो ते आता असं न करता आपण त्याच सालीच्या टूटी-फ्रूटी करणार आहोत
साहित्य
कलिंगडाच्या साली (पांढरा भाग) १ वाटी
साखर १/२ वाटी पाणी २ वाटी
पाणी गरजेनुसार साली उकळण्यासाठी
खाण्याचा रंग लाल पिवळा हिरवा
कृती
कलिंगडाच्या सालीचा हिरवा भाग काढा त्यातला फक्त पांढरा भाग काढून घ्या मग त्याचे लहान चौकोनी आकाराचे कापून घ्या
गॅसवर खोलगट भांड ठेवून त्यात पाणी घालून तापवून घ्या त्यात त्या सालीचे तुकडे घालून ५ मिनिटे उकळवून घ्या
गॅस बंद करून त्या साली चाळणीत काढून घ्या त्यातले पाणी पूर्ण निथळू द्या
आता एका टोपात २ वाटी पाणी आणि १/२ वाटी साखर घालून उकळवून घ्या
(साखर येथे मी आवडीनुसार घेतली आहे मला खूप गोडसर नको आहे तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता)
तीन वेगळ्या लहान टोपात समप्रमाणात साखरेचं पाणी घालून त्यात प्रत्येकी वेगळा खाण्याचा रंग घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या
मग त्यात उकळून घेतलेले सालीचे तुकडे घालून पुन्हा साखरेच्या पाण्यात उकळवून घ्या पूर्ण पाणी सुखेपर्यंत करून घ्या
आता हे तीन रंगी टूटी-फ्रूटी सुती स्वच्छ कपड्यावर पसरवून घाला पंख्याखाली सुखवून घ्या ४ ते ५ तास
पूर्णपणे सुखलेले हवे असेल तर पूर्ण दिवस कडक उन्हात सुखवून घ्या
मला हे ज्यूसी व मऊसर हवे आहेत म्हणून मी पंख्याखाली सुखावले आहेत
टिप
साखर आवडीनुसार वापरावी
फक्त सालीचा पांढरा भागच घ्यावा
तीन रंग नसतील तर जो खाण्याचा रंग असेल तो वापरावा 


















Comments