कैरी की लोंजी

कैरी की लोंजी

तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी वेळ २५ मिनिटे
कैरी की लोंजी
उन्हाळा लागला की चाहूल लागते ती झाडावरच्या कैरीची...तोंडाला पाणी सुटते
कैरी हे सर्वांनाच आवडते कैरीचे बरेच प्रकार आपण करतो जसं की कैरीचे लोणचे , कैरीचा मुरांबा , कैरीची चटणी इत्यादी आणि सगळ्यांचा आवडता पेय म्हणजे कैरीचं पन्ह...
आज आपण कैरी की लोंजी रेसिपी पाहणार आहोत आता कलोंजी म्हणजे कांद्याचे बिया चवीला खूप छान असतात
कैरी की लोंजी ची चव गोड तिखट आंबट अशी लागते
साहित्य
कैरी १ मोठी
तेल १ लहान चमचा
कलोंजी १ मोठा चमचा
मेथी दाणे १/२ लहान चमचा
सुखी मिरची १
साखर १/३ वाटी
लाल तिखट १/२ लहान चमचा
धने जिरे पूड १/२ लहान चमचा
हळद १/४ लहान चमचा
चवीनुसार मीठ
कृती
सर्वप्रथम कैरी चे आवडीप्रमाणे काप करून घ्यावे लहान मोठे जसे हवे तसे
(कैरीच्या साली न काढता फोडी केल्या आहेत तुम्ही साल काढू शकता)
कढई किंवा खोलगट पॅन तापवून त्यात तेल घालून घ्यावे तेल तापले की त्यात लाल सुखी मिरची तोडून घालावी परतवून घ्यावी
मेथी दाणे व कलोंजी घालून परतवून घेऊन मग त्यात कैरीचे कापलेले फोडी घालून घ्या 2 मिनिटे परतवून घ्या
आता त्यात लाल तिखट , धने जिरे पूड , हळद , चवीनुसार मीठ मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्या
मग त्यात साखर घालून मिश्रण मध्यम आचेवर शिजवून घ्या म्हणजे साखर विरघळेपर्यंत
गॅस बंद करून गार करून एका बंद हवा बरणीत घालून घ्या
चवीला अतिउत्तम
टीप
कलोंजी मला आवडतात म्हणून १ मोठा चमचा घेतला आहे तुम्ही कमी घालू शकता
साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता
कैरीच्या मोठया फोड्या केल्या की त्या मोठ्या राहतात मी येथे लहान व मध्यम पातळ फोडी केल्या आहेत

Comments