मखानाचे लाडू

मखानाचे लाडू

तयारीसाठी वेळ ५ मिनिटे
बनविण्यासाठी वेळ १५ मिनिटे
वाढणीसाठी ३
साहित्य
मखाना २५० ग्रॅम
डेसीकेटेड खोबरे ५० ग्रॅम
पीठी साखर १२५ ग्रॅम
साजूक तूप १०० ग्रॅम
वेलची पूड १/२ लहान चमचा
काजू बदाम तुकडे १ मोठा चमचा
चारोळी भरड १ लहान चमचा
दूध २ लहान चमचा
कृती
कढई तापवून मध्यम आचेवर मखाने भाजून घ्या साजूक तूपावर खमंग भाजून घ्या अगदी थोडे लालसर होईपर्यंत भाजून घ्या
सर्व मखाने भाजल्यावर त्याच कढईत मंद आचेवर डेसीकेटेड खोबरे तूपावर खमंग भाजून घ्या
मखाने व डेसीकेटेड खोबरे थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या
आता एका भांड्यात वाटून घेतलेले मखाने व डेसीकेटेड खोबरे , वेलची पूड, काजू,बदाम,चारोळी ह्यांची पूड व पीठी साखर सर्व एकजीव करून घ्या
गरम करून साजूक तूप घाला व मिश्रण एकत्र करून घ्या त्यात १ ते २ लहान चमचा दूध घालून मिश्रण एकजीव करून मग मध्यम आकाराचे लाडू वळून घ्या
अश्याप्रकारे मखानाचे लाडू तयार
हे लाडू हवाबंद बाटलीत किंवा हवाबंद डब्यात ठेऊ शकता
टीप
मखाने छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या
काजू बदाम व चारोळी हे तूपात खरपूस भाजून घ्या व मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्या

Comments