कराची हलवा

कराची हलवा
तयारीसाठी वेळ १० मिनिटे 
बनविण्यासाठी वेळ ३० मिनिटे
साहित्य
कॉर्न फ्लोअर १ वाटी
 तूप १०० ग्रॅम
 साखर ५०० ग्रॅम
 पाणी ३ १/२ वाटी
 लिंबाचा रस १ टिस्पून
अननस इसेन्स  ३ ते ४ थेंब
कलिंगडाच्या बिया १/४ वाटी
पिवळा खाण्याचा रंग २ थेंब
कृती
प्रथम एका भांड्यात कॉर्न फ्लोअर आणि पाणी एकत्र करून त्याला व्यवस्थित एकजीव करून घ्या व बाजूला ठेवून द्या
गॅसवर खोलगट  पॅन किंवा कढई ठेवून त्यात पाणी आणि साखर घालून मंद आचेवर गरम करून घ्या साखर विरघळेपर्यंत गरम करायचे आहे आता त्यात १ लिंबाचा रस घाला व मिश्रण एकजीव करून घ्या लिंबाच्या रसामुळे स्वाद येईल आणि पाकाला पारदर्शकता येईल गॅस बंद करा
आता कॉर्नफ्लोरचं मिश्रण हळू हळू साखरेच्या पाण्यात घाला एका हाताने मिश्रण घाला आणि दुसऱ्या हाताने सतत ढवळत राहा म्हणजे व्यवस्थित एकजीव होईल
आता गॅस चालू करा व सतत ढवळत राहा मिश्रण पूर्ण आटेपर्यंत व पारदर्शक होईपर्यंत 
आता तूप घालून मिश्रण पुन्हा ढवळत राहायचे आहे त्यात अननस चा एस्सेन्स किंवा आवडीनुसार घाला व पिवळा रंग घालून मिश्रण एकजीव करून घ्या मग त्यात कलिंगडाच्या बिया घालून मिश्रण एकजीव करून घ्या
ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात फिरवून घ्या मग त्यात हलव्याचे मिश्रण घाला पसरट करून १ तासासाठी बाजूला ठेवून द्या म्हणजे सेट होईल
मग त्याचे चौकोनी किंवा आवडत्या आकाराचे काप करून घ्या अश्याप्रकारे हा कराची हलवा तयार आहे
टीप 
येथे अननस चा इसेन्स वापरला आहे तुम्ही आवडीनुसार वापरू शकता 

Comments