कैरीचा ठेचा

कैरीचा ठेचा 










तयारीसाठी वेळ १० मिनिटे 

बनविण्यासाठी वेळ १५ मिनिटे 
कैरीचा ठेचा 
साहित्य
कैरी १ मोठी 
हिरव्या मिरच्या १० ते १५ 
लसूण पाकळ्या १५ ते २०
शेंगदाणे १/३ वाटी 
जिरे १ मोठा चमचा 
हिंग १/३ लहान चमचा 
मीठ चवीनुसार 
तेल १ मोठा चमचा
कृती 
कैरी खूप कच्ची घेतली नाही आहे थोडी पिकलेली आहे 
कैरी धुऊन त्याची साल काढून घ्या व मिरच्यांची देठ काढून घ्या 
तव्यावर तेल गरम करून त्यावर शेंगदाणे भाजून घ्या भाजलेले शेंगदाणे काढून त्यात  
मिरच्या व लसूण पाकळ्या परतवून घ्या मग त्यात कैरीचे तुकडे, जिरे , हिंग व मीठ घालून घ्या गॅस बंद करुन सर्व साहित्य  गार करून घ्या 
हा ठेचा मी खलबत्यात जाडसर ठेचून घेतला आहे (तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता)
सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर वाटून घ्या 




Comments