चिकन बिर्याणी

चिकन बिर्याणी

तयारीसाठी वेळ 
बनविण्यासाठी वेळ १ तास ३० मिनिटे
वाढणीसाठी ३
साहित्य
चिकन ५०० ग्रॅम
दही १/२ कप
लिंबाचा रस १ मोठा चमचा
कांदे ५ ते ६
टोमॅटो पुरी १ वाटी
हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या २ ते ३
कोथिंबीर मध्यम १ जुडी
पुदिना मध्यम १ जुडी
आलं लसूण पेस्ट ३ मोठे चमचे
लाल तिखट २ मोठे चमचे
हळद १ लहान चमचा
धने पावडर १ मोठा चमचा
जिरे पावडर १ मोठा चमचा
गरम मसाला १ लहान चमचा
बिर्याणी मसाला १ मोठा चमचा
मीठ चवीनुसार
तेल २ मोठे चमचे
भात बनविण्यासाठी
बासमती तांदूळ ५०० ग्रॅम
तेल किंवा तूप १ मोठा चमचा
तेजपान २
लवंग ३ ते ४
काळीमिरी ३ ते ४
वेलदोडे २
चक्रीफुल १
दालचिनी १/२ इंच
मीठ १ लहान चमचा
लिंबाचा वरचा पातळ तुकडा १
पाणी तांदूळ १ १/२ मग किंवा अंदाजेनुसार
केशरी रंगासाठी
केसर ८ ते १०
कोमट दूध १/४ कप
लेयरसाठी लागणारे
कोथिंबीर बारीक चिरलेली
पुदिना बारीक चिरलेली
तळलेला कांदा (बरिस्ता)
कृती
प्रथम तांदूळ धुवून भिजत ठेवा २ ते ३ तासांसाठी
मग चिकन धुवून त्याला आलं लसूण पेस्ट १ लहान चमचा, लाल तिखट १ लहान चमचा , लिंबाचा रस व किंचित मीठ लावून बाजूला ठेवून द्या
३ मोठे कांदे उभे पातळ चिरून किंचित मीठ चोळून तेलात सोनेरी रंगाचे होईपर्यंत मंद आचेवर तळून घ्या व एका किचन पेपरवर काढून घ्या.
आता एक पातेलं घ्या त्यात तेल घाला गरम झालं की त्यात चिरलेला कांदा घालून परतवून घ्या चांगला लालसर होईपर्यंत परतवून घेतल्यावर त्यात टोमॅटो प्युरी घालून परतवून घ्या 
मग आलं लसणाची पेस्ट व हिरव्या मिरच्या घालून खमंग येईपर्यंत परतावेत
आता सर्व मसाले घाला म्हणजे लाल तिखट , गरम मसाला , बिर्याणी मसाला , धने व जिरे पावडर , हळद व मीठ चवीनुसार घालून मंद आचेवर परतवून घ्या
आता मॅरीनेट केलेलं चिकन घाला व थोडं गरम पाणी घालून झाकण ठेवून शिजवून घ्या
चिकन शिजले की त्यात थोडं तळलेला कांदा घाला व एकजीव करून घ्या
आता भात बनविण्यासाठी तांदूळ भिजत ठेवले आहे
एक मोठं पातेलं घ्या त्यात तूप किंवा तेल घालगरं झालं की वेलदोडे , लवंग , काळीमिरी , दालचिनी , तेजपान घाला व परतवून घ्या मग पाणी घाला मीठ व लिंबाचा तुकडा घालून पाणी चांगला उकळवून घ्या
पाणी चांगला उकळले की भिजवलेले बासमती तांदूळ पाण्यातून काढून पातेल्यात घाला मग हलक्या हाताने हलवून घ्या एक उकळी येऊ द्या मोठी
भात जास्त शिजवायचे नाही आहे मग चाळणीत भात काढा व त्यावर थोडा गार पाणी मारून घ्या जेणेकरू भात चिकट होणार नाही
आता चिकन ही शिजल असेल चव चाखून बघा सर्व मसाले व्यवस्तीत आहे का
दुसरे खोलगट मोठे पातेलं घ्या त्यात चिकन मसाला वर भात मग त्यावर चिरलेली पुदिना , कोथिंबीर व तळलेला कांदा घाला व पुन्हां असेच दोन वेळा थर द्या
मग झालं की त्यावर थोडया पांढऱ्या भातात केसर दूध मिसळा मग भात केसरी रंगाचा भात वर पसरवून घाला त्यावर तुपाची धार सोडुन झाकण लावून त्या पातेल्याखाली तवा ठेवून त्यावर काहीतरी जड पाण्याने भरलेला पातेलं किंवा कळशी ठेवून द्या व बिर्याणी चांगली मंद आचेवर वाफवून शिजवून घ्या
बिर्याणी झाली की पुन्हा त्यावर कोथिंबीर , पुदिना व तळलेला कांदा घालून सजावट करा
मग गरमागरम हैद्राबादी बिर्याणी तयार
बिर्याणी सोबत कोशिंबीर , सॅलड्स , इत्यादी सोबत खाऊ शकतो

Comments