कलिंगडाचा शीरा/हलवा

कलिंगडाचा शीरा/हलवा

तयारीसाठी वेळ १० मिनिटे
बनविण्यासाठी वेळ २५ मिनिटे
वाढणीसाठी ३
साहित्य
कलिंगडाचा ज्यूस/रस १ वाटी
रवा १/२ वाटी
तूप २ मोठे चमचे
साखर १/४ वाटी
जायफळ पूड  १/३ लहान चमचा
बदामाचे काप १ चमचा
काजुचे काप १ चमचा
कृती
प्रथम एका कढईत रवा तुपावर खरपूस सोनेरी रंगाचा होईपर्यंत खमंग भाजून घ्या
मग त्यात कलिंगडाचा ज्यूस/रस घालून मंद आचेवर परतून/शिजवून घ्या
 (कलिंगडाचा रस मी गाळून घेतले नाही त्यातल्या बिया काढून मिक्सरमधून वाटून घेतला आहे )
झाकण ठेवून ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या
साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्या साखर पूर्णपणे एकजीव झाली की ३ ते ४ मिनिटे झाकण ठेवून  शिजवून घ्या
साखरेच्या पाण्यात / पाकात रवा छान शिजून येतो फुलतो छान 
जायफळ किसून घाला  मग त्यात काजू व बदामाचे काप घालून मिश्रण  एकजीव करून घ्या  
गॅस बंद करावा
त्यावर बदामाच्या कापाणे सजावट करा
टीप
कलिंगडाचा ज्यूस/ रस गाळून घेऊ शकता
पाण्याचा व रंगाचा वापर करू नये

Comments