ब्लॅक फॉरेस्ट केक

ब्लॅक फॉरेस्ट केक

साहित्य
चॉकलेट स्पॉंज
कंडेस्ड मिल्क ४०० ग्रॅम
बटर ६० ग्रॅम
मैदा २०० ग्रॅम
कोको पावडर १० ग्रॅम
बेकिंग पावडर १ लहान चमचा
दूध १०० मिली
सोडा वॉटर १०० मिली
केक क्रिम फेटलेली २५० ग्रॅम
चेरी बारीक केलेली
साखरेचं पाणी
डार्क चॉकलेट किसलेले
ताजी चेरी
कृती
ब्लॅक फॉरेस्ट केक हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार केक आहे तर आज आपण बनऊयात ब्लॅक फॉरेस्ट केक
ओव्हन १८०* से वर गरम करत ठेवा बेकिंग ट्रे ला ग्रीस करा व मैदा शिंपडून घ्या
मैदा ,  बेकिंग पावडर  , कोको पावडर घालून एकत्र करून ठेवा
एका बाउल मध्ये बटर व कंडेस्ड मिल्क व्हिस्क करा क्रीम होईपर्यंत व्हिस्क करा
आता मैद्याचं मिश्रण घालून एकजीव करून घ्या आता दूध घालून व्हिस्क करून घ्या
पाण्यात फ्रुट सॉल्ट घालून लगेचच मिश्रणात घाला व एकजीव करून घ्या व्हिस्क करू नका
तयार मिश्रण ट्रे मध्ये घालून ओव्हन मध्ये ठेवून १८०* से वर २० ते २५ मिनिटे बेक करून घ्या
बेक झाल्यावर केक गार करून घ्या
आता चॉकलेट स्पॉंज मधून कापून घ्या वर साखरेचं पाणी शिंपडून घ्या मग फेटलेलं फ्रेश क्रीम लावून घ्या व चेरी घाला मध्यम आकाराच्या कापलेले सर्वत्र घालून घ्या
आता पुन्हा तसच करून घ्या
शेवटच्या केक स्पॉंज वर साखरेचं पाणी शिंपडून केक ची क्रीम लावून पूर्ण फिनिशिंग करून घ्या ८ ते १० मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा
मग किसलेले डार्क चॉकलेट केक ला लावून घ्या
आता क्रीम चा ड्रॉप देऊन ताजी चेरी लावून घ्या
फ्रीज मध्ये ठेवा व सेट करा मग सर्व्ह करा
टिप
ओव्हन नसेल तर कुकर किंवा कढईत स्पॉंज बेक करू शकता

Comments